26-8-2023 रोजी वाईमध्ये ' लोकमान्य टिळक आणि वाईकर ' या पुस्तक प्रकाशनाचा सोहळा अतिशय उत्तम पद्धतीने पार पडला .
सकाळी १० वाजता चित्रकार व कलाशिक्षक श्री .सुरेश वरगंटीवार ,पुणे यांच्या लोकमान्यांची विविध वेगवेगळ्या वैशिष्ठ्यपूर्ण माध्यमात साकारलेल्या 75 चित्रांचे प्रदर्शन वाईला लोकमान्य वाचनालयाच्या कलादालनात भरले होते . त्यावेळी वाईतील अनेक शाळांच्या विद्यार्थीवर्गाने व वाईतील मान्यवरांच्या उपस्थितीमूळे समारंभ छान व वैशिष्ठयपूर्ण झाला . लोकमान्यांचीच चित्रे , लोकमान्यांचेच पुस्तक व लोकमान्य वाचनालयातच भरलेल्या या पुस्तक प्रकाशन समारंभाला लोकमान्यांचे पणतू श्री .दीपक टिळक उपस्थित होते . अतिशय सुबक , नीटनेटका हा कार्यक्रम झाला . वक्त्यांच्या अभ्यासपूर्ण भाषणांमूळे लोकमान्यांचे अनेक पैलू वाईतील उपस्थित रसिकानां अनुभवता आले . खऱ्या अर्थाने तो दिवसच लोकमान्यमय झाला होता .
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा